गुजरात : अल्लाहची 99 नावं घेत या बोहरी महिला करतात 'मुस्लीम' योग

गुजरात : अल्लाहची 99 नावं घेत या बोहरी महिला करतात 'मुस्लीम' योग

नियमितपणे योग निरोगी आयुष्याची किल्ली आहे, असं म्हणतात. पारंपारिक विचारधारेत योगचा संबंध हिंदू आध्यात्माशीच जोडला गेला आहे.

पण, योगासनांचा आरोग्यलाभ ओळखून गुजरातमधील बोहरी मुस्लीम महिलांनी योग करण्यास सुरुवात केली आहे.

योगासनं करताना त्या अल्लाहची ९९ नावं घेतात. आणि अशा रीतीनं हिंदू परंपरेतून आलेल्या योगासनांना हे मुस्लीम लोकही आत्मसात करतात.

बीबीसीसाठी पारस झा यांचा रिपोर्ट.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)